

VRG26B06791
मालेगाव (ता. बार्शी) येथील बाजीराव जगदाळे यांच्या शेतातील पावसाअभावी वाया गेलेले सोयाबीन पीक.
वैराग परिसरात पिकाची वाढ खुंटली
शेंगांना पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली
वैराग, ता. २१ ः पावसाने दडी मारल्याने वैराग परिसरातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी पिकाची वाढ खुंटली असून अनेक शेतांमध्ये सोयाबीनची पाने वाळून पिकाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र, त्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकाला आवश्यक ओलावा मिळाला नाही. परिणामी, सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच पाणी न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात सुकून गेले आहे.
मालेगाव येथील श्री. बाजीराव जगदाळे यांच्या गट क्रमांक ३२३ मधील शेतातील सोयाबीन पिकाची पाण्याअभावी अक्षरशः पाला-पाचोळा झाल्याचे दिसून येत आहे. शेंगांची पापडी बनली असून पिकाची पाने वाळली आहेत. शेतातील मोठ्या क्षेत्रावरील पिकाची वाढ खुंटल्याचे दिसत आहे.
पावसाअभावी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नसल्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत अन् पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.