

उत्रौली, ता. १७ : उत्रौली (ता. भोर) परिसरात सोयाबीनचा भुस्सा जनावरांच्या चाऱ्यासाठी साठवण्याकडे कल वाढू लागला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनच्या भुस्स्याला ‘भाव’ आला आहे.
तालुक्यात दुष्काळाची छाया गडद होत असताना जनावरांचा चारा कसा उपलब्ध करावयाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या सोयाबीनची काढणी आणि भरडणी सुरू आहे. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनला अल्प प्रमाणात शेंगा लगडल्या. पावसाअभावी शेंगा पोचट राहिल्याने ज्वारीच्या दाण्याच्या आकारापेक्षा थोडे मोठे सोयाबीन तयार झाले आहे. काढणी झाल्यावर शेतकरी सोयाबीनची भरडणी करतात. त्याचा भुस्सा शेतातच जाळून टाकत असत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काही शेतकरी हा भुस्सा साठवून ठेवत आहेत.
सोयाबीनच्या भुस्स्यामध्ये प्रथिनांचे (११ टक्के ते १५ टक्के) प्रमाण अधिक असते. पचनास सुलभ असून यातील फायबर जनावरांच्या कोठ्यातील जिवाणूंना सक्रिय ठेवते. त्यामुळे जनावरांची पचनशक्ती सुधारते. दुष्काळातही जनावरांचे दूध उत्पादन आणि शारीरिक ताकद टिकून राहते.
- डॉ. किशोर मुळे, पशुसंवर्धन सहायक आयुक्त (ता.भोर)
सोयाबीनचा भुस्सा थेट सुका देण्याऐवजी कडबा कुट्टीमध्ये कडबा, सोयाबीनचा भुस्सा, मीठपाणी, गुळपाणी शिंपडून तो ओलसर करून दिल्याने जनावरे तो आवडीने खातात आणि वाया घालवत नाहीत. यामुळे सोयाबीनच्या भुस्स्याची साठवणूक केली जात आहे.
- सीमा शिवतरे, शरद शिवतरे, शेतकरी
00987
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.