सोयाबीनच्या दरात सुधारणा, द्राक्षाच्या दराला मात्र लागली दृष्ट,, कांद्याची झाली माती , पालेभाज्या आहेत स्थिर ''
सोयाबीन तेजीत, कांदा मात्र दराअभावी माती
युद्धजन्य परिस्थितीचा बाजारावर परिणाम; फळभाज्यांत मंदी कायम, पालेभाज्या स्थिर
...........
सोलापूर, ता. ७ : युद्धजन्य परिस्थितीमुळे तेल बाजारात तेजी सुरू झाली असून त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरही दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरात सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा झाली आहे. मात्र निर्यातीच्या फटक्यामुळे कांद्याचे दर तळाला गेल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. फळभाज्यांच्या दरात मंदीचे वातावरण कायम असताना पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. दरम्यान, बाजारात नवीन ज्वारीची आवक सुरू झाली असून ज्वारीचे दर प्रतिक्विंटल सुमारे साडेतीन हजार रुपयांच्या जवळपास आहेत.
मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्यातील उपवासामुळे भाज्यांच्या मागणीत घट झाली आहे. याचाच परिणाम दरावर झाला आहे. बाजारात फळभाज्यांचे दर कमी झाले आहेत. मात्र फ्लावर सारख्या भाज्यांमध्ये सध्या दारात सुधारणा दिसून येत आहे. वाढत्या उन्हामुळे पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटली आहे दर मात्र स्थिर आहेत. तेल बाजारात तेजी सुरू झाल्यामुळे सोयाबीनच्या दरात काही अंशी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेने सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल चारशे रुपयांची वाढ दिसून येत आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात फळाची आवक सुरू असल्यामुळे दर स्थिर आहेत. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे द्राक्ष निर्यातीला फार मोठा फटका बसला आहे. निर्यादक्षम द्राक्ष सध्या स्थानिक बाजारात विक्रीसाठी दाखल होत असल्यामुळे द्राक्षाच्या दरात फार मोठी घसरण झाली आहे. वाढलेल्या उन्हामुळे परत एकदा लिंबू बाजार गरम झाला आहे. लिंबूचे कमाल दर परत एकदा १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.
चौकट
भाजीपाल्यांचे शेकडा दर
कोथिंबीर ४००- ६००
मेथी ४००- ६००
राजगिरा ३००-५००
शेपू ५००-७००
पालक ४००-५००
तांदूळसा २००-४००
अंबाडी ३००-४००
कांदापात ४००-६००
चुका ३००-३००
.....
फळभाज्यांचे प्रति दहा किलो कमाल व सरासरी दर
बीट ६०-८०
कारले ३००-४००
वांगी १२०-२००
कोबी ५०-७०
ढोबळी मिरची १००-१५०
गाजर १००-१५०
गवार ८००-१२००
काकडी -१२०-२५०
घेवडा २५०-३००
हिरवी मिरची ५००-६५०
भेंडी ३००-६००
दोडका २००-३००
टोमॅटो ८०-१३०
बटाटा १००-१३०
मुळ्याची शेंग ३००-३५०
वाटाणा. २८०-३३०
बिन्स २००-२२०
तोंडले २५०-३००
शेवग्याची शेंग ४००-५००
लिंबू ५५०-११५०
फ्लावर (१०० नग) ८८०-१२८०
.......
फळांचे प्रति दहा किलो दर
सफरचंद १०००-१५००
बोर ५००-५३०
चिकू २००-३००
पेरू १४०-२५०
मोसंबी २५०-३२०
पपई १२०-१५०
अननस २५०-३००
सिताफळ ८००-८००
डाळिंब ८००-१५००
द्राक्ष (पेटी) १६०-२८०
संत्रा ६००-७५०
खरबूज २००-४००
कलिंगड १२०-२५०
आंबा १००० पेंटी
........
भुसार बाजार, प्रतिक्विंटल दर
गुळ ४१००-४१५०
तूर ६६००-६७००
हरभरा ५०३०-५०५०
ज्वारी ३३५०-३७००
सोयाबीन ५४००-५५००
लसुन ६५००-८८००
चौकट
शनिवारच्या कांदा बाजाराची स्थिती.
शनिवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये३५ हजार ६९३ क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये कमाल १८०० रुपये प्रतिक्विंल तर सरासरी ८०० प्रति क्विंटल इतका दर मिळाला. दोन दिवसाच्या दराच्या स्थितीत काही अंशी सुधारणा झाली आहे. लसणाचे दर मात्र मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. गत आठवड्याच्या तुलनेने लसणाच्या दारात प्रति क्विंटल हजार रुपयांची घट दिसून आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

