सोयाबीनवरील कीड व रोग

सोयाबीनवरील कीड व रोग
Published on

पुरवणी लेख - तातडीने
००००००००००००००००००००००

सोयाबीनवरील कीड, रोग नियंत्रणाचे उपाय
----------------------------------
सध्याच्या हवामान बदलाच्या काळात सोयाबीन पिकामध्ये कीड, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भावाची लक्षणे तपासून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
----------------------
प्रवीण देशपांडे, डॉ. सोनाली लोखंडे
---------------------
सप्टेंबर महिन्यात सोयाबीन पीक साधारणपणे फुलोऱ्यात किंवा शेंगा धरण्याच्या (दाणे भरण्याच्या) अत्यंत संवेदनशील अवस्थेत असते. या काळात ढगाळ व दमट हवामानामुळे चक्रीभुंगा, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, उंट अळी या किडींचा तसेच करपा व तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणावर आढळून येत असतो.

चक्रीभुंगा ः
लक्षणे :
- मादी पानाच्या देठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर दोन गोल चक्राकार (रिंग) खाचा तयार करते आणि त्यामध्ये अंडी घालते. यामुळे चक्राच्या वरील भाग आणि पाने सुकून वाळतात.
- अंड्यातून निघालेली अळी खोडाचा आतील भाग पोखरून पोकळ करते, ज्यामुळे झाड वाळते आणि शेंगा लागण्याचे प्रमाण प्रचंड घटते.
नियंत्रण ः प्रति लिटर पाणी
आर्थिक नुकसान पातळी (३ ते ५ प्रादुर्भावग्रस्त झाडे प्रति मीटर ओळ) ओलांडल्यास,
- प्रोफेनोफॉस (५० ईसी) ः २ मिलि किंवा
- थायाक्लोप्रिड (२१.७ एससी) ः १.५ मिलि

तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिट्युरा)
लक्षणे :
- सुरुवातीला लहान अळ्या पानाच्या मागील बाजूचे हरितद्रव्य खरवडून खातात, ज्यामुळे पाने जाळीदार होतात. नंतरच्या अवस्थेत मोठ्या अळ्या अधाशीपणे पूर्ण पाने खाऊन नष्ट करतात आणि शेतात फक्त पानाच्या शिरा किंवा खोडच शिल्लक राहते.
- सप्टेंबर महिन्यात या अळ्या थेट शेंगा व कोवळे दाणे कुरतडून खातात.
नियंत्रण ः प्रति लिटर पाणी
- प्रति एकर २ ते ३ कामगंध सापळे लावावेत.
- प्रादुर्भाव सुरुवातीला असल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
- तीव्र प्रादुर्भाव असल्यास क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ः ०.४ मिलि किंवा
- इमामेक्टिन बेंझोएट (५ टक्के एसजी) ः ०.४ ग्रॅम किंवा
- फ्ल्युबेंडायअमाईड (३९.३५ एससी) ः०.३ मिलि
----------------

उंट अळी ः
लक्षणे :
- सुरुवातीच्या प्राथमिक अवस्थेतील लहान अळ्या पानांमधील हरितद्रव्य (हिरवा भाग) खरवडून खातात. यामुळे पाने पांढरट आणि कागदासारखी पातळ दिसतात.
- अळ्या जशा मोठ्या होतात, तशा त्या पानांना कडेपासून खाण्यास सुरुवात करतात, पानांवर मोठी ओबडधोबड छिद्रे पाडतात.
- प्रादुर्भाव तीव्र झाल्यास अळ्या संपूर्ण पान फस्त करतात. झाडावर पानांच्या फक्त मुख्य शिराच शिल्लक राहतात.
-पानांची कमतरता भासल्यास किंवा प्रादुर्भाव जास्त असल्यास अळ्या फुले, कोवळ्या शेंगांना प्रादुर्भाव करतात.

आर्थिक नुकसानीची पातळी ः
- पीक फुलोऱ्यात असताना प्रति मीटर ओळीत ४ अळ्या किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेत ३ अळ्या आढळल्यास रासायनिक नियंत्रणाचा अवलंब करावा.
- शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी प्रति हेक्टरी १० ते १२ पक्षी थांबे (टी-आकार) उभारावेत, जेणेकरून पक्षी अळ्या वेचून खातील.

नियंत्रणाचे उपाय ः प्रति लिटर पाणी
- बिव्हेरिया बॅसियाना ः ५ ग्रॅम
- क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) ः ०.३ मिलि किंवा
- फ्लुबेन्डायअमाइड (२० टक्के डब्ल्यूजी) ः ०.५ ग्रॅम किंवा
- स्पिनेटोरम (११.७ टक्के एससी) ः ०.९ मिलि

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

रोग :
पानावरील बुरशीजन्य ठिपके, करपा ः
लक्षणे:
- सप्टेंबरच्या पावसानंतर हवेतील तापमान व आर्द्रता वाढल्यास पानांवर कोनीय, तपकिरी ते जांभळ्या रंगाचे लहान ठिपके पडतात. हे ठिपके नंतर एकत्र येऊन संपूर्ण पान करपल्यासारखे दिसते. परिणामी, झाडाची प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावून शेंगांमधील दाणे बारीक राहतात.
नियंत्रण ः प्रति लिटर पाणी
- टेब्यूकोनॅझोल अधिक सल्फर (६५ टक्के डब्ल्यूजी) संयुक्त बुरशीनाशक ः २.५ ग्रॅम किंवा
- मॅन्कोझेब अधिक कार्बेन्डॅझिम संयुक्त बुरशीनाशक ः २ ग्रॅम
- ॲझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के अधिक डायफेनोकोनॅझोल(११.४ टक्के एससी) संयुक्त बुरशीनाशक ः १ मिलि

तांबेरा ः
लक्षणे :
- दमट, आर्द्र आणि ढगाळ हवामानात हा बुरशीजन्य रोग अत्यंत वेगाने पसरतो.
- सुरुवातीला जमिनीलगतच्या पानाच्या खालील बाजूस अत्यंत लहान फिकट तपकिरी किंवा काळपट रंगाचे ठिपके (पुळ्या) दिसतात. रोग वाढल्यावर पाने तांबूस-तपकिरी होऊन वाळतात व मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. यामुळे उत्पादनात ५० ते ८० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते.
नियंत्रण ः प्रति लिटर पाणी
- टेब्यूकोनॅझोल (२५.९ टक्के ईसी) ः १.५ मिलि किंवा
- फ्ल्युक्झापायरॉक्सॅड अधिक पायरॅक्लोस्ट्रॉबीन (संयुक्त बुरशीनाशक) ः ०.७ मिलि


चारकोल रॉट ः
- जेव्हा पाण्याचा दीर्घ खंड पडतो, हवेतील तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त वाढते आणि जमिनीतील ओलावा कमी होतो, तेव्हा या रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो. प्रामुख्याने फुलोऱ्यापासून ते दाणे भरण्याच्या आणि पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत जास्त दिसून येतो.
लक्षणे ः
- सुरुवातीला शेतातील काही भागांतील झाडांची पाने मलूल होतात, पिवळी पडू लागतात. पाने सुकल्यानंतरही झाडाला तशीच चिकटून राहतात, लगेच गळत नाहीत.
- रोगट झाड उपटून पाहिले असता, त्याच्या मुख्य आणि उपमुळांची साल सहजपणे हाताने अलगद निघून येते.
- रोगाच्या शेवटच्या अवस्थेत जमिनीलगतचा खोडाचा भाग आणि मुळे करड्या-भुरकट किंवा काळसर रंगाची होतात.
- प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या वरच्या भागातील शेंगा चपट्या राहतात किंवा त्यात दाणे भरत नाहीत.

नियंत्रण ः प्रति लिटर पाणी
- कार्बेन्डाझिम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के डब्लूपी) (संयुक्त बुरशीनाशक) : ३ ते ४ ग्रॅम

-----------------
संपर्क ः प्रवीण देशपांडे, ९४२१८३०४३९
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथे कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com