Sharad Pawar : तरुणांना रोजगारासाठी संघर्ष करावा लागेल ; शरद पवार,देशात १० वर्षांत फक्त सात लाख नोकऱ्या

देशातील बेरोजगारांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्‍वासन नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपूर्वी दिले होते. प्रत्यक्षात या कालावधीत फक्त सात लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली. परिणामी बेरोजगारी वाढली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार देशातील ८३ टक्के तरुण बेरोजगार आहेत.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal

पुणे : देशातील बेरोजगारांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्‍वासन नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपूर्वी दिले होते. प्रत्यक्षात या कालावधीत फक्त सात लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली. परिणामी बेरोजगारी वाढली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार देशातील ८३ टक्के तरुण बेरोजगार आहेत. त्यामुळे तरुण अस्वस्थ झाले असून रोजगारासाठी त्यांना संघर्ष करावा लागेल. या संघर्षात मी तरुणांच्या सोबत असेन, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. ६) पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात सांगितले.

अखिल भारतीय शिव महोत्सव समिती आयोजित ‘अस्वस्थ तरुणाईशी शरद पवार यांचा थेट संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, राजे यशवंतराव होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर, आमदार रवींद्र धंगेकर, अशोक पवार, अंकुश काकडे, समितीचे संस्थापक अध्यक्ष विकास पासलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, ‘‘दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्‍वासन पंतप्रधान मोदी यांनी पाळले नाही. सर्वच नोकरभरती प्रक्रियांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. तो थांबविण्यासाठी कडक कायदा करण्याची गरज आहे. कंत्राटी पद्धतीची भरती बंद झाली पाहिजे. ‘बार्टी’, सारथी, महाज्योती आणि अमृत अशा सर्वच संस्थांना सक्षम केले पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याज माफ केले पाहिजे. विविध खात्यांमधील रखडलेल्या नोकरभरती प्रक्रिया त्वरित पूर्ण केल्या पाहिजेत.’’

Sharad Pawar
Sangli loksabha Constituency : सांगलीवरून खडाखडी सुरूच ; संजय राऊत यांच्या टीकेनंतर काँग्रेसचा सबुरीचा सल्ला

आयोजक विकास पासलकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सप्तर्षी, होळकर, धंगेकर यांचीही भाषणे झाली. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे आणि सरकारी नोकरीत नुकतीच विविध पदांवर निवड झालेले विजय आंधळे, उझमा शेख, श्रद्धा उरणे आदी स्पर्धा परिक्षा विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही मनोगत व्यक्त केले.

त्यांनी नोकरभरतीमधील समस्या मांडल्या. याशिवाय अश्विनी सातव-डोके, सक्षणा सलगर, विशाखा भालेराव, ॲड. प्राजक्ता पवार, लेशपाल जवळगे, मिनाक्षी जावळे आदींनी स्पर्धा परीक्षांबाबतच्या अडचणी सांगितल्या. या वेळी पवार यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेद्वारे विविध पदांवर निवड झालेल्या अविनाश लोंढे, सोमेश्‍वर गोटे, उझमा शेख, श्रद्धा उरणे, शुभम पाटील, विकास करंडे, धनंजय घुले यांचा सत्कार करण्यात आला. विराज तावरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत धुमाळ यांनी आभार मानले.

‘शरद पवार आजचे शिवाजी महाराज’

मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, ‘‘शरद पवार हे केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा बुलंद आवाज आहेत. ते खऱ्या अर्थाने आजच्या काळातील छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपण सर्वांनी मावळे म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com