esakal | Pune : आधार नावनोंदणीसाठी टपाल विभागाकडून विशेष मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri : गुरुवारपासून शहरात आधार-नोंदणी विशेष मोहीम

Pune : आधार नावनोंदणीसाठी टपाल विभागाकडून विशेष मोहीम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात मुलांच्या आधार नोंदणीसाठी टपाल विभागाकडून एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचा कालावधी येत्या १५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती टपाल विभागाच्या वतीने देण्यात आली.

जिल्ह्यात टपाल कार्यालयांकडून आधार अद्ययावत आणि मोबाईल लिंकिंगचे नुकतेच आयोजन करण्यात आले. आधार नावनोंदणी आणि अद्ययावत सेवा देण्यासाठी अगदी सणाच्या दिवसांमध्येही टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पुणे जिल्ह्यात या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता आणि नागरिकांच्या मागणीमुळे टपाल विभागाने आधार नोंदणी अद्ययावत, मुलांच्या नावनोंदणीची मोहीम १५ तारखेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे टपाल विभागाकडून पुढील टप्प्यात १६ आणि १७ सप्टेंबर रोजी पुणे, नगर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात आधार सक्षम पेमेंट सिस्टमद्वारे कोणत्याही बँक खात्यातून डोअर-स्टेप कॅश काढण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोस्ट ऑफिस किंवा आयपीपीबी खाते नसले तरीही या सुविधेचा वापर नागरिकांना त्यांच्या आधार लिंक बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी केला जाऊ शकतो. मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि गृहिणींसाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे. त्यासाठी नागरिकांनी त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा पोस्टमनशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोस्ट मास्तर बी.पी. एरंडे यांनी केले आहे.

loading image
go to top