पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिस सज्ज झाले आहे. पावणेदोन हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेतली असून शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, राज्य राखीव पोलिस बलाच्या तुकड्या तैनात केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.