पुणे - पुणे महापालिकेत प्रशासकराज असताना अनेक माजी नगरसेवक त्यांच्या प्रभागातील कामे करण्यासाठी निधीची मागणी प्रशासनाकडे करतात, पण निधी नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, स्थायी समितीच्या बैठकीत स्वीकृत सदस्य हा कोणत्याही प्रभागाचा नसतानाही त्या पदाच्या नावासाठी प्रभाग क्रमांक १६ साठी पाच निविदा मंजूर करून त्यातून २ कोटी ४४ लाख ४६ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे या पाचही निविदांसाठी एकच ठेकेदार पात्र ठरला आहे.