काटी गावातील जलरत्न, जलरागीनींचा पाणी फाऊंडेशनच्या वतीने विशेष सन्मान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करून आपली गावे जलसंपन्न करण्यासाठी विशेष सहभाग नोंदवून काटी (ता. इंदापूर) या गावाने जल आणि मृदू संधारणासाठी काम केलेल्या जलरत्न व जलरागीनींचा सन्मान आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.

वडापुरी : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 अंतर्गत पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करून आपली गावे जलसंपन्न करण्यासाठी विशेष सहभाग नोंदवून काटी (ता. इंदापूर) या गावाने जल आणि मृदू संधारणासाठी काम केलेल्या जलरत्न व जलरागीनींचा सन्मान आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. इंदापूर येथील पंचायत समितीच्या लोकनेते कै. शंकरराव पाटील सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी काटी गावातील जलरत्न, जलरागीनी व ग्रीन काटी सोशल फाउंडेशन यांना प्रशस्तिपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच रमल वाघमोडे, दत्तात्रेय माने, वैभव वाघमोडे, सचिन आरडे, कृषी अधिकारी हनुमंत बोराटे, सुनील मोहिते, चंद्रकांत भोसले, रेशमा वाघमोडे, शशिकांत कुलकर्णी, तुकाराम मोहिते उपस्थित होते.

दत्तात्रेय भरणे म्हणाले कि या पुढील काळातही तालुक्यातील कोणत्याही गावामध्ये जलसंधारणाच्या कामासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने निधी देताना कधीच कमी पडणार नसल्याचे सांगितले. जलसंधारणाच्या कामासाठी हातभार लावणारे शासकीय कर्मचारी, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी सुद्धा यावेळी उपस्थित होते. 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

       


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Honor of Jalaratna Jalaragini by Water Foundations at vadapuri taluka indapur