स्वराज्य शपथभूमीवर भारतीय टपाल खात्याकडून विशेष टपाल पाकिटाचे अनावरण

यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत वारसा जगभरात पोचू शकणार आहे. हे विशेष पाकीट तयार करण्यासाठी बायोस्फिअर्स चे अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी प्रस्ताव सादर केला होता.
विशेष टपाल पाकिटाचे अनावरण
विशेष टपाल पाकिटाचे अनावरणsakal

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर येथील हिंदवी स्वराज्य शपथभूमीवर भारतीय टपाल खात्याने विशेष टपाल पाकिटाचे लोकार्पण केले आहे. या पाकिटाचे प्रकाशन टपाल सेवा विभागाच्या संचालिका सिमरन कौर यांच्या हस्ते नुकतेच झाले. यामुळे रायरेश्वराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत वारसा जगभरात प्रभावीपणे आणि अधिकृतपणे पोहचू शकणार आहे. हे विशेष पाकीट तयार करण्यासाठी बायोस्फिअर्स चे अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी प्रस्ताव सादर केला होता.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावरील मुऱ्हा-पठारावर श्री रायरेश्वराचे प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे. याच मंदिरात शिवाजी महाराजांनी एप्रिल १६४५ ला अठरापगड जातीतील सहकारी मावळ्यांसोबत त्या काळच्या परकीय जुलमी राजवटी विरोधात ‘हिंदवी स्वराज्य’ या स्वतंत्र राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली होती. त्यामुळे या पवित्र ‘हिंदवी स्वराज्य शपथभूमी’ ला मराठ्यांच्या इतिहासात आणि एकुणातच भारत देशाच्या परंपरेत विशेष आदराचे स्थान असल्याचे मत सर्वच मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

विशेष टपाल पाकिटाचे अनावरण
पुणे : 18 ते 15 वयोगटातील लसीकरणात ग्रामीण भागाची आघाडी

देशाच्या एका महत्त्वाच्या आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा असलेल्या रायरेश्वर या प्रेरणाभूमीला सन्मानित करण्यासाठी भारत सरकारच्या टपाल खात्याच्या माध्यमातून आणि बायोस्फिअर्स संस्था व श्री रायरेश्वर ग्रामस्थ संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांतून “रायरेश्वर - हिंदवी स्वराज्य शपथभूमी” या विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन रायरेश्वर येथे करण्यात आले. त्यावेळी सिमरन कौर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे, बायोस्फिअर्स चे अध्यक्ष व या विशेष टपाल पाकिटाचे प्रस्तावक व संकल्पक डॉ. सचिन पुणेकर, महाराष्ट्र वनविभागाचे (कार्य आयोजन) मुख्य वनसंरक्षक नानासाहेब लडकत, श्री रायरेश्वर ग्रामस्थ संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय जंगम आदी उपस्थित होते.

प्रकाशन सोहळ्याला पुणे ग्रामीण डाकघर अधीक्षक प्रमोद भोसले, द.उपविभागीय सहा. अधीक्षक डाकघर भोर संजय भंडारी, शिवप्रेमी पराग शिळीमकर, सुनिल जंगम, समीर घोडेकर, सचिन देशमुख, सुनिल चिकणे, लहू किंद्रे, सखाराम जंगम, किशोर जंगम, शैलेंद्र पटेल, राजेश महांगरे, अमित गाडे, शाहू सावंत सह टपाल खाते सह वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी सह स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी उपस्थित होते.

सुत्रसंचालन विठ्ठल दानवले यांनी व प्रास्ताविक डॉ. सचिन पुणेकर यांनी तर आभार रविंद्र जंगम यांनी मानले.

या विशेष आवरणाच्या निर्मिती मध्ये आणि कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व सहभागी शिवप्रेमी आणि इतर सेवाभावी संस्था - ग्रामपंचायत, रायरी; सह्याद्री सर्च अँड रेस्क्‍यू फोर्स; आम्ही भोरकर संस्था; स्वराज्यभूमी प्रतिष्ठान; सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्टान आणि स्थानिक ग्रामस्थ, नागरिक यांचे महत्वाचे योगदान होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com