जनरल तिकिटासह विशेष रेल्वे सुरू | Railway | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway
जनरल तिकिटासह विशेष रेल्वे सुरू

जनरल तिकिटासह विशेष रेल्वे सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने जनरल (अनारक्षित) तिकिटावरील प्रवास बंद केला होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुणे-सोलापूर, दौंड (पुणे)-निजामाबाद, पुणे-कोल्हापूर आणि पुणे-दौंड आदी मार्गांवरील विशेष रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकिटाने प्रवाशांना आता प्रवास करता येणार आहे. हा निर्णय रेल्वेने जाहीर केला असून, या सर्व विशेष गाड्या १० डब्यांसह धावणार आहेत.

कोरोनामुळे आरक्षित (कन्फर्म) तिकीट असेल, तरच रेल्वेने प्रवास करता येत होता. जनरल (साधे) तिकिटाची विक्री बंद करण्यात आली होती. आता मात्र जनरल तिकिटाने रेल्वेने प्रवास करता येणार आहे. असे असले तरी, ज्या प्रवाशांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत, त्यांनाच प्रवास करता येणार आहे.

हेही वाचा: वाळू लिलावाबाबत लवकरच स्वतंत्र अध्यादेश प्रसिद्ध होईल : बाळासाहेब थोरात

अशा धावतील गाड्या

  • पुणे-सोलापूर (०१४२१) : १५ नोव्हेंबरपासून ही गाडी पुण्यातून दररोज सकाळी ८.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सोलापूरला दुपारी ३.३५ वाजता पोचेल.

  • सोलापूर-पुणे (०१४२२) : १६ नोव्हेंबरपासून ही गाडी सोलापूर येथून दररोज रात्री ११.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.०० वाजता पुण्यात पोचेल.

  • दौंड-निजामाबाद-पुणे (०१४०९) : १५ नोव्हेंबरपासून दौंड येथून ही गाडी दररोज सायंकाळी ४.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता निजामाबाद येथे पोचेल.

  • निजामाबाद- दौंड-पुणे (०१४१०) : १७ नोव्हेंबरपासून निजामाबाद येथून ही गाडी दररोज रात्री ११.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता पुण्यात पोचेल.

  • पुणे-सातारा (०१५३९) : १५ नोव्हेंबरपासून पुणे येथून ही गाडी दररोज संध्याकाळी ६.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता सातारा येथे पोचेल.

  • सातारा-पुणे (०१५४०) : १७ नोव्हेंबरपासून सातारा येथून ही गाडी सकाळी ६.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १०.२५ वाजता पुण्यात पोचेल.

loading image
go to top