कात्रज बाह्यवळण मार्गाच्या कामाला वेग

Katraj-Highway
Katraj-Highway
Updated on

खडकवासला - शहराचा पश्‍चिम व दक्षिण भाग जोडणारा वडगाव बुद्रूक येथील नवले पूल ते कात्रज या महामार्गाच्या सहा पदरीचे काम लॉकडाउनमुळे रखडले होते. या कामाने मागील आठवड्यापासून वेग घेतला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमुळे मजूर गावाला गेल्याने या रस्त्याचे काम थांबले होते. मजूर परतल्याने आता कामाला सुरुवात झाली आहे. ठेकेदाराकडून मे २०२१ अखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मागील आठवड्यात पाऊस उघडल्याने कामाचा वेग वाढला आहे, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे

  • कामाचे भूमिपूजन - नोव्हेंबर २०१९
  • काम पूर्ण करण्याचा कालावधी - १८ महिने
  • रस्त्याची लांबी - ३.८८ कि. मी. 
  • सध्याच्या महामार्गाची रुंदी - १७ मीटर
  • महामार्गाची वाढणारी रुंदी - ८ मीटर
  • नियोजित रस्त्याची रुंदी - ६० मीटर
  • अपेक्षित खर्च - ९६ कोटी रुपये
  • सेवा रस्त्याची रुंदी - साडेसात मीटर 
  • आंबेगाव खिंड फोडणार
  • गावाच्या हद्दी - वडगाव बुद्रूक, नऱ्हे, आंबेगाव बुद्रूक, आंबेगाव खुर्द, कात्रज
  • दत्तनगर व शिवसृष्टी - भुयारी मार्गाचे रुंदीकरण
  • डीमार्ट व ऑर्किड शाळेजवळ पादचारी भुयारी मार्ग

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com