Bus Accident : भरधाव बस कंटेनरवर धडकली; दहा प्रवासी जखमी

मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर जांभूळवाडी परिसरात भरधाव प्रवासी बस कंटेनरवर धडकून अपघात झाला.
accident
accidentsakal
Updated on

पुणे - मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर जांभूळवाडी परिसरात भरधाव प्रवासी बस कंटेनरवर धडकून अपघात झाला. या अपघातात दहा प्रवासी आणि बसचालक किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बसचालकाविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदानंद महादेव खोत (वय ३०, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) हे खासगी प्रवासी बस चालवत होते. २४ मार्च रोजी बस कोल्हापूरच्या दिशेने जात असताना जांभूळवाडी परिसरात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस भरधाव वेगाने कंटेनरवर आदळली. या अपघातात बसचालकासह दहा प्रवासी जखमी झाले.

या अपघातानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. याबाबत विश्वतेज अभिमन्यू जाधव (वय २३, रा. हडपसर) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बसचालक सदानंद खोत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार पी. एन. कांबळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com