पारगाव - धामणी, ता. आंबेगाव येथे पारगाव लोणी रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे..पारगाव लोणी रस्त्यावर बढेकरवस्ती जवळ काल सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भगवान बाबुराव बढेकर (वय-51 वर्षे, रा. ज्ञानेश्वरवस्ती, जारकरवाडी ता. आंबेगाव) हे रस्त्याच्या कडेला मोटार सायकल (नं. एम.एच. १४ डी.एस. ९१८२) हिच्यावर बसून संपत बढेकर यांचे सोबत गप्पा मारत होते..त्याच वेळी पाठीमागुन येणारे पांढ-या रंगाची टाटा (टेम्पो नंबर एम.एच. १४ एच.यु. २७५३) गाडीवरील चालक विकासकुमार सकल सहानी (सध्या रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) याने त्याचे ताब्यातील चारचाकी गाडी हि भरधाव वेगात हयगयीने, निष्काळजीपणे चालवुन भगवान बढेकर व मोहन लक्ष्मण खैरे (रा. खैरेनगर, ता. शिरुर) यांचे मोटार सायकलला पाठीमागुन धडक दिल्याने भगवान बाबुराव बढेकर यांचा मृत्यू झाला. तर मोहन लक्ष्मण खैरे जखमी झाले आहे. पारगाव कारखाना पोलिसांनी टेम्पो चालकाच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे करत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.