Delhi Pune Flight: विमानात गुदमरला प्रवाशांचा जीव! स्पाइसजेटच्या दिल्ली-पुणे विमानात बिघाड; एसी बंद होऊन केबिनमध्ये गरम हवा

SpiceJet Delhi Pune Flight AC Fails Passengers Face Hot Cabin: एसी बंद, एपीयूमधून केबिनमध्ये गरम हवा; लहान मुले, गर्भवतींचा श्वसनाचा त्रास, प्रवाशांचे उड्डाण रद्द करण्यासाठी आंदोलन
SpiceJet Delhi Pune Flight Develops Technical Glitch AC Stops Working Leaving Passengers Struggling in Hot Cabin

SpiceJet Delhi Pune Flight Develops Technical Glitch AC Stops Working Leaving Passengers Struggling in Hot Cabin

sakal

Updated on

पुणे : दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात मंगळवारी रात्री तांत्रिक बिघाड झाल्याने वातानुकूलित यंत्रणा (एसी) बंद होऊन एपीयू (ऑक्झिलरी पॉवर युनिट)मधून गरम हवा थेट केबिनमध्ये येऊ लागली. परिणामी विमानातील तापमान वाढल्याने लहान मुले आणि गर्भवतींना श्वसनाचा त्रास झाला. त्यामुळे प्रवाशांनी उभे राहून विमानाचे उड्डाण रद्द करण्याची मागणी केली. मुख्य वैमानिकाने विमान धावपट्टीवर आणले. अखेर तांत्रिक पथकाने विमानात बिघाड झाल्याचे जाहीर केल्यावर उड्डाण रद्द करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com