
पुणे: पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेट (एसजी ९३७) विमानाचे उड्डाण झाल्यानंतर सुमारे दीड तासाने पुणे विमानतळावर पुन्हा लँडिंग झाले. कॉकपिटमधील हवेचा दाब कमी झाल्याने विमानाचे लँडिंग झाल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, तांत्रिक बिघाड असताना लँडिंगला उशीर का झाला, या निमित्ताने प्रश्न निर्माण झाला आहे.