पुणे - विमानाच्या वेळेत वारंवार होणारा बदल आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मुजोर वृत्ती याचा फटका पुण्यातील प्रवाशांना बसला. विमानाची वेळ वारंवार बदलल्याने प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला..दिल्लीहून सोमवारी (ता. ३१) पुण्याला येणारे स्पाइसजेटचे 'एसजी ९३९' हे विमान सायंकाळी ४.५५ वाजता उड्डाण करणार होते. मात्र, कंपनीकडून कोणतीही ठोस व्यवस्था न करता विमानाची वेळ वारंवार बदलण्यात आली. आधी पहाटे ४, नंतर ६, ८.३० आणि थेट ९.३० अशी वेळ पुढे ढकलण्यात आल्याने प्रवाशांना रात्रभर दिल्लीत अडकून पडावे लागले. परिणामी हॉटेल, जेवण व प्रवासापोटी तब्बल १२ हजार चारशे रुपयांचा नाहक भुर्दंड बसला..दरम्यान, एक सप्टेंबर रोजी दिल्ली विमानतळावर चेक-इन करताना कर्मचाऱ्यांनी सामानाच्या वजनावरून वाद घातला. लेह येथून आलेले सामान 'जैसे थे' असल्याचे सांगूनही उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्याने 'फालतू माणसे' अशी अपमानास्पद भाषा वापरत 'तिकीट लॉक करून कसे जाता ते पाहतो' अशी उघड धमकी दिली..या संपूर्ण गैरप्रकाराबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून खर्चाची भरपाई, नुकसानभरपाई आणि उद्धट अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी प्रवासी ॲड. सतीश गोरडे आणि ॲड. सायली गोरडे केली आहे. अन्यथा ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.