
पुणे : शहरात बंद सदनिकांमध्ये घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कोंढवा परिसरातील सुखसागरनगर, नऱ्हे आणि बिबवेवाडी परिसरातील बंद सदनिकांमधून चोरट्यांनी १६ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली. याबाबत कोंढवा, नांदेडसिटी आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.