
वेळापूर : पुरंदवडे येथील रिंगणात थोडे थबकत चालणाऱ्या माउलींच्या अश्वाने खुडूस येथील रिंगण रंगविल्याने वारकऱ्यांमध्ये चैतन्य संचारले होते. माउलींचा पालखी सोहळा सायंकाळी वेळापूरच्या धावाबावीजवळ धावा करून भारुडाच्या लोकरंगात एकरूप झाला. भारुडातून प्रबोधनाबरोबर लोकरंगात वैष्णव न्हाऊन निघाले.