

धर्मस्थानी केलेले श्रवण आचरणात आणा
धर्मस्थानी येऊन संतांचे प्रवचन ऐकण्याबरोबरच त्यातील विचार आचरणात आणले, तरच श्रवणाचे सार्थक होईल. संसारातील विचार बाजूला ठेवून श्रद्धा, विश्वास आणि समर्पण भावनेने संतवाणी आत्मसात करा. प्रवचन ऐकताना मन संसारात राहिले, तर त्यातून मिळणारा बोध जीवनात उतरणार नाही. संतांचे विचार घेऊन धर्मस्थळातून परत जा, कोरडे परतू नका, असे आवाहन साध्वी अक्षयश्री म. सा. यांनी केले. पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर जप, तप, ध्यानधारणा व उपवासातून आत्मशुद्धी साधण्याची संधी आहे. कर्म करताना विवेक बाळगल्यास कर्मबंधन टाळता येते, असेही त्यांनी सांगितले. बलिदान चौकातील जैन स्थानकात आयोजित अक्षय चातुर्मासात त्या बोलत होत्या.
-----------------------------
पापापासून दूर राहा
सापाची भीती वाटते; मात्र त्यापेक्षाही भयंकर असलेल्या पापाची भीती माणसाला वाटत नाही. साप एका जन्मात मृत्यूचे कारण ठरतो; पाप मात्र मृत्यू आणि अनंत संसाराच्या परंपरेचे कारण बनते. त्यामुळे सापाला नव्हे, पापाला घाबरा आणि त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, असा संदेश मुनीश्री प्रशांतरत्न विजयजी यांनी दिला. जोडभावी पेठेतील श्री आदेश्वर जैन श्वेतांबर मंदिरात दैनिक प्रवचनात ते बोलत होते. पर्युषण महापर्व त्याग, आत्मशुद्धी व पापांपासून मुक्त होण्याचे पर्व असल्याचे त्यांनी सांगितले. ८ सप्टेंबरपासून पर्युषण महापर्वाला प्रारंभ होत असून, मुनिश्रींची प्रवचने माहेश्वरी भवनात सकाळी नऊ वाजता होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.