

लखनौ, ता. १३ (पीटीआय) : नैतिकता आणि लोककल्याण हा राजकारणाचा आधार असावा, असे मत व्यक्त करत संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज ‘राजकारणाचे अध्यात्मिकरण’ करण्याची गरज व्यक्त केली. निवडणुकीत विजय होवो अथवा पराभव, मी योग्य तेच करेन, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
लखनौ येथे दिव्य संस्कृती भवनाचे उद्घाटन राजनाथसिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले,‘‘केवळ सत्ता मिळविणे, निवडणूक जिंकणे आणि सत्तेत टिकून राहणे हे राजकारणाचे ध्येय असू नये. देश आणि समाजाला दिशा देण्याचे कामही राजकारणाद्वारे होणे आवश्यक आहे. नैतिकता आणि अध्यात्मिक संवेदनशीलता यांचा आधार असल्यास राजकारणाच्या माध्यमातून लोककल्याणाचे खरे ध्येय साध्य करता येते.’’ ब्रह्माकुमारी संस्थेला ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारत वेगाने प्रगती करत असून विविध क्षेत्रांमध्ये देशाने बराच मोठा पल्ला गाठला असल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले. मात्र, भौतिक जगात विकास करत असताना मनावरील नियंत्रण सुटत आहे काय, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. ध्यानधारणा आणि नियोजनबद्ध जीवन जगण्याचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे विविध संशोधनातून सिद्ध झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.