Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

राज्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित भरतीकडे सरकारचे दुर्लक्ष; विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरील धोका दाखवून संघटनांचा आझाद मैदानावर बेमुदत धरण्याचा इशारा
Physical education teachers in Maharashtra have announced an indefinite protest demanding immediate recruitment through the Pavitra Portal.

Physical education teachers in Maharashtra have announced an indefinite protest demanding immediate recruitment through the Pavitra Portal.

Sakal

Updated on: 

पुणे : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा केवळ कागदावरच गाजावाजा करणाऱ्या राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीअभावी शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास केवळ नावालाच उरला आहे. परिणामी, हजारो विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. राज्य सरकारच्या या अनास्थेविरोधात आता क्रीडा शिक्षकांनी आंदोलनाचा इशारा देत आक्रमक पाऊल उचलले आहे. राज्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांची रखडलेली भरती तात्काळ आणि वेगाने करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने येत्या बुधवारपासून (ता. ८) मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Visapur teacher recruitment news
Pavitra Portal teacher recruitment 2026
Komal Khatale Sonwalkar Pavitra Portal selection
Maharashtra Teacher Recruitment
Marathi News Esakal
www.esakal.com