Annasaheb Pathare
sakal
वडगाव शेरी - ज्येष्ठ कुस्तीसंघटक, मल्लांचे आश्रयदाते म्हणून ओळख असलेले तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे (वय-७८) यांचे सोमवार दिनांक 11 मे 2026 रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.