
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षण आणि विस्तार विभागात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील चार वर्षांच्या एकात्मिक बी.एस्सी. बी.एड., बी.ए. बी.एड. आणि बी.कॉम. बी.एड. अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी केवळ ‘एनसीईटी २०२५’ (आयटीईपी) प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी पात्र आहेत. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना येत्या रविवारपर्यंत (ता. १३) ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.