
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्या सहकार्याने उन्हाळी २०२५ सत्र परीक्षांचे पहिल्या टप्प्यातील निकाल शनिवारी जाहीर करण्यात आले. पहिल्या टप्प्यात जवळपास ३७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील निकालसुद्धा जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येतील, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिली.