
Pune University
Sakal
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भोजनगृहातील गुणवत्ता राखली जावी, यासाठी आता विद्यापीठातर्फे भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत पाच विद्यार्थी, पाच विद्यार्थिनी अशा एकूण दहा विद्यार्थ्यांचा समावेश असेल. या समितीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे सहायक कुलसचिव शिवाजी उत्तेकर यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.