

भरती पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन
अहिल्यानगर, ता. १४ ः भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे नवयुवक - नवयुवतींसाठी ता. १५ जून ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ६७ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिली.
प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासोबतच मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहिल्यानगर ता. ८ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता उपस्थित रहावे. उमेदवारांनी सैनिक कल्याण विभागाच्या (डीएसडब्ल्यू) अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना व प्रवेशपत्र डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.