पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून (ता. २४) सुरू होत आहे. यात दहावीच्या परीक्षेसाठी ३४ हजार ५६२ आणि बारावीच्या परीक्षेसाठी ६८ हजार ९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणारी ही पुरवणी परीक्षा यंदा जूनमध्येच सुरू होत आहे.