सोमेश्वरनगर - आईच्या अचानक झालेल्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही नीरा (ता. पुरंदर) येथील ईशिता संजय शहा या विद्यार्थिनीने दहावीचे सीबीएससी बोर्डाचे पेपर दिले होते. आईचेच स्वप्न साकार करण्यासाठी ती कणखरपणे दुःखाशी लढली. अखेर दहावीच्या निकालात तिला ९५.८० टक्के गुण मिळाले. तिने जणू गुणांची श्रद्धांजली आईला अर्पण केली आहे.