पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. १३) दुपारी एक वाजता ऑनलाइनद्वारे जाहीर होणार आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी नऊ विभागीय मंडळातून तब्बल १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीचा निकाल राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.