
पुणे - कॉपीमुक्त अभियानाच्या नावाखाली परीक्षा केंद्रातील केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि शिक्षकेतर यंत्रणा बदलण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. हा आदेश रद्द न केल्यास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीची परीक्षा प्रक्रिया, उत्तरपत्रिका तपासणी यावर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण समन्वय समिती, सर्व शैक्षणिक संघटना व्यासपीठ यांनी दिला आहे.