SSC Result 2023 : आईवडील बिगारी कामगार; लातूरहून पोटापाण्यासाठी स्थलांतरीत झालेली सृष्टी आळंदीतून प्रथम

सृष्टीने आळंदीतील सर्व शाळांतून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
SSC Result 2023
SSC Result 2023Sakal

आळंदी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने शुक्रवारी २ जून रोजी इयत्ता दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल ९३.८३ टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी निकालात घट झाली असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

दरम्यान, आळंदी येथील पोटापाण्यासाठी लातूरहून स्थलांतरीत झालेल्या कुटुंबातील लेकीने चक्क ९७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. सृष्टी पांचाळ असं या विद्यार्थीनीचं नाव असून तीने ५०० पैकी ४८५ गुण मिळवले आहेत. आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती.

SSC Result 2023
SSC Result 2023: प्रतीक्षा संपली, दहावीचा निकाल जाहीर, एका क्लिकमध्ये पहा तुमचे मार्क
Srushti's Result
Srushti's ResultSakal

विशेष म्हणजे सृष्टीचे आईवडील हे कुटुंबाच्या उपजिविकेसाठी लातूरहून पुण्यातील आळंदी येथे काही वर्षापूर्वी स्थलांतरित झाले होते. त्यामुळे सृष्टी हिला तेथीलच ज्ञानेश्वर महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेऊन दिला होता. सृष्टीची आई ही कंपनीत कामासाठी जाते. तर वडील हाताला मिळेल ते काम करून कुटुंबाची उपजिविका भागवत होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांपैकी ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९८.११ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तर नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.६४ टक्के इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com