पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलै २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना गुरुवारपासून (ता. १५) ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १५ ते २४ मे पर्यंत, तर विलंब शुल्कासह २५ ते २९ मे पर्यंत पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करता येतील, अशी माहिती राज्य मंडळाने दिली.