
माले : मुळशी धरण भागातून जाणा-या पुणे-कोलाड रस्त्यावर चाचीवली (ता.मुळशी) येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. शुक्रवार(ता.२९) सकाळी ८.३० वाजण्याचे सुमारास हा अपघात झाला. पुण्याहून कोकण दिशेने जाणारी चिंचवड खेड बस व कोकण बाजुने पुणेकडे येणारी श्रीवर्धन बीड बसमध्ये वळणावर समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सुमारे १० ते १५ प्रवासी, चालक मुक्कामार लागून किरकोळ जखमी झाले. सुदैवाने अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.