एसटी बस लुटणाऱ्या चौघांना कोठडी

एसटी बस लुटणाऱ्या चौघांना कोठडी
Published on

शिरूर, ता. ६ : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर एसटी बस अडवून चालक-वाहकास बेदम मारहाण करत रोकड लुटणाऱ्या चौघांना शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, शिरूर न्यायालयाने आरोपींना मंगळवारपर्यंत (ता. ८) पोलिस कोठडी सुनावली असून,
अजयकुमार शिनू चव्हाण (वय २४, रा. राष्ट्रप्रेम नगर, ता. हवेली, मूळ रा. चमना, ता. शहापूर, जि. यादगीर, कर्नाटक), सचिन अशोक घोलप (वय २२, रा. दिघी, ता. हवेली, मूळ रा. बोरगाव, गेवराई, जि. बीड), पवन मधुकर घोलप (वय २५, रा. आळंदी, ता. खेड, मूळ रा. बोरगाव, ता. गेवराई, जि. बीड), आकाश सोमनाथ काळे (वय २१, रा. आळंदी, ता. खेड, मूळ रा. बोरगाव, ता. गेवराई, जि. बीड) असे कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत.
शिरूरजवळील न्हावरे फाटा येथे शुक्रवारी (ता. ४) मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. विनाक्रमांकाच्या काळ्या स्कॉर्पिओ जीपमधून आलेल्या हल्लेखोरांनी एसटी बस (क्र. एमएच १४ एनपी ०८३८) अडवली. बस घासल्याचा बनाव करून त्यांनी चालक संदीप गणपत थोरवे यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. नकार देताच त्यांना बेदम मारहाण केली. मदतीसाठी धावून आलेले वाहक सतीश अण्णासाहेब बाचकर यांनाही मारहाण करून त्यांच्याकडील तिकीट विक्रीचे आठ हजार ९६० रुपये आणि बसची चावी हिसकावून घेतली. वाहनातून कोयते काढण्याची धमकी देत प्रवाशांमध्ये दहशत पसरवून हल्लेखोरांनी बसवर दगडफेक करत पोबारा केला. घटनेनंतर चालक-वाहकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली. गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ जीप (क्र. एमएच १४ एनडब्ल्यू ५२३४) जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींना बेड्या
पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शिरूर, अहिल्यानगर, आळंदी, भोसरी परिसरातील १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून विविध ठिकाणांहून आरोपींना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com