४० वर्षांवरील ‘एसटी’ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

४० वर्षांवरील ‘एसटी’ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
Published on

एसटी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी रखडली
नेत्र तपासणी वेळेवर होत नसल्याचा ‘सेवाशक्ती संघटने’चा दावा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सोलापूर विभागातील चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी अनेक दिवसांपासून रखडी असून चालकांची नेत्र तपासणीदेखील होत नसल्याचा दावा सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने केला आहे.
४० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांनी दर दोन वर्षांनी वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक आहे. याबरोबरच एसटीचालकांची नेत्र तपासणीही वेळेवर होत नसल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. याबाबत सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने सोलापूर विभाग नियंत्रकांना लेखी निवेदनही देण्यात आले आहे. या निवेदनावर सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे सोलापूर विभागीय सचिव संजय हराळे आणि विभागीय अध्यक्ष बलभीम पारखे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रती माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी कामगार अधिकारी, आणि सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.


कोट
PNE26W20088
कर्तव्यावर असताना एखाद्या कर्मचाऱ्याला अचानक आरोग्याची गंभीर समस्या उद्भवल्यास किंवा चालकाची दृष्टी कमजोर झाल्यास मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे एसटी महामंडळाच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान तर होईलच, शिवाय लाखो प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
- संजय हराळे, विभागीय सचिव, सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य
.................
PNE26W20090
भविष्यात घडू शकणारे संभाव्य अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी महामंडळाने तातडीने सोलापूर विभागातील सर्व चाळीस वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाईल.
- अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक, सोलापूर

.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com