विरोधी गटातील तरुणासमवेत फिरत असल्याच्या कारणावरुन कोयत्याने वार

या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
stabbed by mob
stabbed by mobsakal

पुणे : विरोधी गटातील तरुणासमवेत फिरत असल्याच्या कारणातून टोळक्‍याने तरुणावर कोयत्याने वार केले. या घटनेत तरुणाने वार चुकवून जीव वाचविला, त्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग करताना रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करीत दहशत निर्माण केली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

stabbed by mob
चालता चालता मोबाईल केला लंपास;पाहा व्हिडिओ

मॉंटी ऊर्फ कुणाल मारुती कालेकर (वय 22, रा. व्हिआयटी कॉलेजसमोर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयुर जगताप (वय 22, रा.अप्पर इंदिरानगर) याने फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक यश बोराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप व सौरभ शिंदे हे दोघेही एकाच गल्लीत राहण्यास असून त्यांची एकमेकांशी तोंडओळख आहे. जगताप हा शिंदे याच्याशी ये-जा करताना बोलत असतो. दरम्यान, शनिवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जगताप हा त्याच्या घरी पायी जात होता.

stabbed by mob
इंदापूर : हर्षवर्धन पाटीलांच्या वाढदिवसानिमित्त देशीरोपांचे वाटप

त्यावेळी कालेकर हा त्याच्या साथीदारांसह रिक्षातुन तेथे आला. त्याने फिर्यादीस अडवून शिवीगाळ करीत "तु सौरभ शिंदेबरोबर का फिरतोस, तुला आता संपवून टाकतो' अशा शब्दात दमदाटी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने कोयता काढून फिर्यादीवर वार केले. मात्र फिर्यादीने वार चुकवून तेथून पळ काढत जीव वाचविला. आरोपींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी आरडाओरडा करीत रस्त्यावर थांबलेल्या दोन टेम्पोची तोडफोड केली. आरोपींनी कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक यश बोराटे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com