

पुणे - नसरापूर येथे बालिकेवर अत्याचार प्रकरणातील मुलीच्या घरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (ता.४) सायंकाळी भेट दिली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत नराधम आरोपीला फाशी मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कधीही माझ्याशी काही बोलायचे असेल तर मला सांगा मी तुमच्या घरी येईल असे आश्र्वस्त केले.