Pune City Overhead Cables
sakal
पुणे - शहरातील रस्ते, झाडे, इमारती आणि विद्युत खांबांवर परवानगीशिवाय टाकलेल्या ओव्हरहेड केबल्सना तात्पुरत्या स्वरूपात वर्षभरासाठी नियमित करण्याच्या महापालिकेच्या धोरणाला स्थायी समितीने मंजुरी दिली. या धोरणानुसार दूरसंचार व टेलिकॉम कंपन्यांना प्रतिकिलोमीटर तीन लाख रुपये, तर इंटरनेट व ब्रॉडबँड कंपन्यांना प्रतिकिलोमीटर एक लाख रुपये वार्षिक शुल्क भरून केबल सुरू ठेवता येणार आहेत. मात्र, अधिकृत केबलच्या दरापेक्षा अनधिकृत केबल नियमित करण्याचे शुल्क कमी असल्याने नव्या अनधिकृत केबलचे पेव फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.