Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

पुणे शहरात नव्याने जाहिरात बोर्ड उभारण्यासाठी तयार केलेल्या प्रस्तावास मान्यता नाही.
Shrinath Bhimale

Shrinath Bhimale

sakal

Updated on

पुणे - शहरात नव्याने जाहिरात बोर्ड उभारण्यासाठी तयार केलेल्या प्रस्तावास मान्यता मिळत नसल्याने अतिरिक्त आयुक्त प्राजीत नायर यांना स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी धमकी दिल्याचा प्रकार आज (ता. २०) दुपारी सर्वसाधारण सभेत घडला. या वर्तणुकीमुळे आयुक्त नवल किशोर राम हे देखील भयंकर चिडले होते. अनेक नगरसेवकांना असा काही प्रकार झाल्याचे माहिती नाही, पण पत्रकार कक्षामध्ये बसलेल्या पत्रकारांच्या नजरेतून हा प्रकार सुटला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com