Sanitation Workers
sakal
पुणे - शहरात कचरा संकलन करणाऱ्या स्वच्छ कर्मचाऱ्यांना गलिच्छ वातावरणात काम करावे लागत असताना त्यांना साहित्य पुरविण्याच्या निविदेला टक्केवारीचा दुर्गंध सुटला आहे. महापालिकेने या कर्मचाऱ्यांना थेट साहित्य देणे आवश्यक असताना मंजूर झालेली निविदा रद्द करून थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात (डीबीटी) पैसे जमा केले जाणार आहेत. त्यास स्वच्छ संस्थेने तसेच प्रशासनाने नकार दिला आहे.