

पुणे - पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीला महापालिका आयुक्तांसह दोन अतिरिक्त आयुक्त आणि अनेक विभागप्रमुख अनुपस्थित राहिल्याने नाराज झालेल्या स्थायी समिती अध्यक्षांसह सदस्यांनी बैठक तहकूब केली. पूर्वनियोजित बैठक असूनही दुपारी एक वाजून दहा मिनिटांपर्यंत महत्त्वाचे अधिकारी उपस्थित न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. अनधिकृत फ्लेक्सबाजीवरून प्रशासनाकडून नगरसेवकांना लक्ष्य केले जात असताना त्यामुळेच ही तहकुबी केल्याची चर्चा महापालिकेत आहे.