

पुणे - जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्ती करण्याचे अधिकार महानगरपालिकेला असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून नागरिकांची प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज दिले.