एआयसीटीई आणि डीआरडीओच्या सहकार्याने एम.टेक अभ्यासक्रम सुरू

एआयसीटीई आणि डीआरडीओच्या सहकार्याने संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एम.टेक अभ्यासक्रम (पदव्युत्तर) सुरू करण्यात आले आहे.
Education
EducationSakal

पुणे - अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) (AICET) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) (DRDO) सहकार्याने संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आवश्यक सैद्धांतिक व प्रयोगात्मक ज्ञान, कौशल्य आणि योग्यता प्रदान करण्यासाठी एम.टेक अभ्यासक्रम (पदव्युत्तर) सुरू करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून महत्वाकांक्षी अभियंत्यांना संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. दिल्ली येथे झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी आणि एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थिती या अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली. (Start MTech Course in Collaboration with AICTE and DRDO)

या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना कॉम्बॅट टेक्नॉलॉजी, एरो टेक्नॉलॉजी, नेव्हल टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन सिस्टम अँड सेन्सर, डायरेक्टेड एनर्जी टेक्नॉलॉजी आणि हाय एनर्जी मटेरिअल तंत्रज्ञान सारख्या सहा प्रमुख विषयांमध्ये प्रशिक्षण घेता येईल. तर हा अभ्यासक्रम एआयसीटीईशी संलग्न असलेले संस्था, महाविद्यालये तसेच आयआयटीच्या शाखा, एनआयटी किंवा खासगी अभियांत्रिकी संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजिस्ट (आयडीएसटी) या विविध संस्थांना मदत करणार आहे. विद्यार्थ्यांना डीआरडीओ प्रयोगशाळा, डिफेन्स पीएसयू आणि इंडस्ट्रीजमध्ये त्यांचे मुख्य प्रबंध कार्य करण्याची संधी सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Education
HCMTR मार्गावर नियो मेट्रो करा; देवेंद्र फडणवीस यांची सूचना

अशा प्रकारच्या अभ्यासक्रमामुळे संरक्षण क्षेत्रासाठी प्रतिभावान कर्मचाऱ्यांना तयार होण्यास मदत होईल. उद्योग क्षेत्रांनी यासाठी सहकार्य करावे आणि विद्यार्थ्यांना संधी द्यावी. असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब नीलकंठ कल्याणी यांनी डीआरडीओ व एआयसीटीई यांचे अभिनंदन केले. तसेच संरक्षण तंत्रज्ञानासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करणे आणि आत्मनिर्भर भारताच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाचा वापर कसा करता येईल याबाबत माहिती दिली.

‘हा अभ्यासक्रम संरक्षण तंत्रज्ञानामध्ये कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासोबतच नवनवीन संरक्षण स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी संधी उपलब्ध करून देईल. तसेच विविध प्रकारचे संशोधन हे दररोजच्या जीवनाशी जोडले गेले पाहिजे. हे मानवी विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

- डॉ. अनिल सहस्रबुद्धे, अध्यक्ष  - एआयसीटीई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com