StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

msd
msd

पुणे - मॉल, बँक किंवा अगदी एखाद्या सरकारी कार्यालयात होणारी गर्दी टाळण्याची कशी ?, या प्रश्नावर आता एका महाविद्यायीन तरुणानी उत्तर शोधले आहे. ही गर्दी टाळण्यासाठी त्याने 'मेंटेन सोशल डिस्टंस’ (एमएसडी) या अनोख्या उपकरणाची निर्मिती केली आहे.

सिंबायोसिस इन्स्टीट्यूट आॅफ बिझनेस मॅनेजमेंटमधील (एसआयबीएम) मंगेश ठोकळ या विद्यार्थ्यांने सोशल डिस्टंसिंग पाळणं सहज सोपं होईल असे एमएसडी हे सेन्सर डिव्हाईस बनवलं आहे. मंगेश हा एसआयबीएम येथे "नावीन्य व उद्योजकता" या विषयातील एमबीएचे शिक्षण घेत आहे. मंगेशने तयार केलेल्या उपकरणामध्ये "सेन्सर्स" चा वापर केला आहे, जेणेकरून हे उपकरण जवळ बाळगणाऱ्या व्यक्तीला त्याद्वारे योग्य सामाजिक अंतर राखणे सोयीस्कर होणार आहे.

'एसआयबीएम'ने तर्फे एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये मंगेशने विजेतेपद पटकावले. स्पर्धेचा विजेता म्हणून मिळालेल्या एक लाख रुपये रक्कमेचा वापर त्याने या उपकरणाच्या निर्मितीसाठी केला आहे. मंगेशने सनराज इन्फोटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरु केली असून या कंपनीतर्फे ग्रामीण आणि शहरी भागात नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवले जातात. या कंपनीचे मुख्य कार्यालय सिंबायोसिसच्या लवळे येथील कॅम्पसमध्येच आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'एमएसडी' या उपकरणाचा विविध खासगी व सरकारी कार्यालये, बँक, दवाखाने, मॉल, शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी उपयोग होऊ शकणार आहे. सध्या आता बहुतांश कार्यालये सुरु झाली असून त्यात सोशल डिस्टंसिंग पाळणंही आवश्यक आहे. त्यासाठी हे उपकरण मदत करेल असे मंगेश याचे म्हणणे आहे. सर्वसामान्यांच्या खरेदीसाठी हे डिव्हाईस उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 

'मेंटेन सोशल डिस्टंस' उपकरण असे होते कार्यन्वित

"अगदी छोटं आणि पोर्टेबल असं हे डिव्हाईस असून ते आपल्या सोबत कॅरी करणं देखील अगदी शक्य आहे. यामध्ये आपण एक अंतर 'सेट' करू शकतो. एकदा एखादे अंतर सेट केल्यानंतर त्या अंतराच्या आतमध्ये जर कुणी आलं तर हे डिव्हाइस विशिष्ट प्रकारचा आवाज (अलार्म वाजवते) करते आणि लाईट फ्लॅश देखील लागते. जेणेकरून सोशल डिस्टंसिंग पाळणे सहज शक्य होते," अशी माहिती मंगेश  ठोकळ याने दिली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एमएसडी' या उपकरणाचे वैशिष्टये :
- सोशल डिस्टंसिंग पाळणे होणार शक्य
- विशिष्ट अंतराच्या आत आल्यास वाजणार अलार्म
- एलईडी लाइट ही लगण्याची सोय
- यूएसबी प्लग डेस्कटॉप, लॅपटॉप, पॉवर बँकला लागण्याची सुविधा
- स्मार्ट वॉल्यूम कंट्रोल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com