स्टार्टअपने बौद्धिक मालमत्ता नियंत्रित करण्याची क्षमता निर्माण करावी - बाबा कल्याणी

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) आणि ‘भाऊज् इनोव्हेशन ॲण्ड इंट्रप्रनरशिप सेल’च्या वतीने दोन दिवसीय ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’चे आयोजन करण्यात आहे.
Baba Kalyani
Baba KalyaniSakal
Summary

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) आणि ‘भाऊज् इनोव्हेशन ॲण्ड इंट्रप्रनरशिप सेल’च्या वतीने दोन दिवसीय ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’चे आयोजन करण्यात आहे.

पुणे - ‘गेल्या ६० वर्षांत देशात अनेक नवनवीन बाबी झाल्या. मात्र त्याची बौद्धिक मालमत्ता आपल्याकडे नाही. त्यासाठी आपण आयातीवर अवलंबून आहोत. त्यामुळे स्टार्टअपने (Startup) बौद्धिक (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी) (Intellectual Property) मालमत्ता नियंत्रित करण्याची क्षमता निर्माण करावी. तसेच तुम्ही जे काही करणार आहात त्यात सातत्य हवे. देशाच्या विकासाला मदत होर्इल, असे काम करण्याची भूमिका हवी,’ असा सल्ला ‘भारत फोर्ज’चे अध्यक्ष बाबा कल्याणी (Baba Kalyani) यांनी स्टार्टअप्सला दिला.

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) आणि ‘भाऊज् इनोव्हेशन ॲण्ड इंट्रप्रनरशिप सेल’च्या वतीने दोन दिवसीय ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’चे आयोजन करण्यात आहे. त्याचे उद्घघाटन शनिवारी (ता. ५) कल्याणी यांच्या हस्ते करण्यात आले.

सीओईपीच्या नियामक मंडळाचे आणि ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, भाऊज इंस्टिट्यूटच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि ‘नाईटोर इन्फोटेक’चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सी. ई. पोतणीस, सीओइपीचे संचालक डॉ. प्रा. बी. बी. आहुजा, डॉ. प्रा. माधुरी कर्णिक आणि फेस्टचे सचिव कैवल्य नंदुरकर यावेळी उपस्थित होते. फेस्टचे हे चौथे वर्ष आहे. कल्याणी म्हणाले, डिजिटलायझेशन आणि पर्यावरणाच्या सुधारणेसाठी सर्वच व्यवसायांमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. त्या अनुषंगाने अनेकांनी आत्तापासूनच काम करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठीच्या नवीन कल्पना सध्या सुरू असलेल्या व्यवसायातून नाही तर स्टार्टअपद्वारे येत आहेत.

Baba Kalyani
पुणे : 'कोम्बिंग ऑपरेशन'मध्ये सराईत गुन्हेगारांची झाडाझडती

पवार म्हणाले, ‘आपल्या प्रयत्नांतून आपण आंतरराष्ट्रीय क्षेत्रात समोरच्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो हे बाबा कल्याणी यांनी दाखवून दिले आहे. तर हाती काहीच नसताना ध्येयवेडे होऊन काम केले तर आपण किती यशस्वी होवू शकतो याची प्रचिती पोतणीस यांच्या प्रवासातून येते. विद्यार्थ्यांकडे काही नवीन कल्पना असेल तर ती प्रत्यक्षात येण्यासाठी सोय-सुविधा आवश्‍यकता असते. विद्यार्थ्यांची ही अडचण सोडविण्याचे काम सीओर्इपी आणि भाऊज् इंट्रप्रनरशिप सेलच्या माध्यमातून होत आहे.’

डॉ. आहुजा म्हणाले, ‘आम्ही एक अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचा फायदा नवकल्पना असलेल्या उद्योजकांनी होईल. त्यातून त्यांना स्वतःचे विश्‍व निर्माण करण्यास मदत होईल.’ डॉ. माधुरी कर्णिक यांनी प्रास्तविकमध्ये या फेस्टची माहिती दिली. सीओईपीचे विद्यार्थी ऐश्वर्या कदम आणि सुयोग देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. आभार कैवल्य नंदुरकर यांनी मानले.

सुरक्षेबाबत देश आत्मनिर्भर होणे महत्त्वाचे -

‘उत्पादन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. हे क्षेत्र आपल्या देशाची ताकद आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला देखील मोठ्या संधी आहेत. प्रत्येक उत्पादन क्षेत्रात इलेक्ट्रीक सिस्टिम असते. जगभरात होत असलेल्या घटनांचे पडसाद आपल्यावर देखील उमटतात. त्यामुळे देशाच्या सुरक्षेबाबत आत्मनिर्भर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे,’ असे कल्याणी म्हणाले.

तर आपला देश नक्की सुपरपॉवर होईल -

‘ग्राहकांची संख्या कमी असेल तर आपल्याला वर्ड क्लास प्लस व्हावे असे आपल्याला इस्त्राईल शिकते. कोणताही व्यवसाय सुरू करताना आपण ग्राहकांना चांगली सेवा देतोय का? तिची किंमत योग्य आहे का? त्यातून ग्राहक समाधानी होताय का? सेवेचा दर्जा चांगला आहे का व ती काळानुरूप अपडेट करत आहोत का? याचा विचार करावा. या सर्व बाबी विचारात घेऊन कामकाज केले तर आपला देश नक्की सुपरपॉवर होईल,’ असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला.

पोतणीस यांनी स्टार्टअप्सला दिलेल्या टिप्स :

- प्रत्येकजण सर्वांसाठी यशस्वीतेचे मॉडेल ठरू शकत नाही

- प्रत्येकाचे व्यवसाय करण्याचे कौशल्य वेगळे असतात

- आपल्यातील क्षमता ओळखून काम केले तर त्यात मोठ्या संधी आहेत

- कोणतेही ध्येय साध्य करीत असताना स्वतःचे परिक्षण केले पाहिजे

- यश आल्यानंतर व्यवसाय साचलेपण येवू देवू नका

- प्रत्येकवेळी यश मिळेल याची खात्री नाही पण अनुभव मिळतात

- भविष्याचे चांगले चित्र पहायचे असेल तर फ्रेमच्या बाहेर यावे लागते

- व्यवसाय अपयशी होवू शकता मात्र यशासाठीचे प्रयत्न महत्त्वाचे असतात

सीओईपी महाविद्यालय - अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) आणि ‘भाऊज् इनोव्हेशन ॲण्ड इंट्रप्रनरशिप सेल’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’चे उद्घघाटन शनिवारी झाले. यावेळी दिपप्रज्वलन करताना (डावीकडून) प्रतापराव पवार, सी. ई. पोतणीस आणि डॉ. प्रा. बी. बी. आहुजा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com