राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
Published on: 

शिवाजीनगर ः मॉडर्न बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात पुण्याची कायरा रैना शटल परतविताना.
--------------

आदित्य, रुहान, कायरा, अनय, तनिष्क, सान्वीची मानांकितांवर मात
राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

पुणे, ता. ६ ः सुधांशु बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए करंडक पंधरा व सतरा वर्षांखालील गटाच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आदित्य यउल, रुहान भाटिया, कायरा रैना, चिन्मय फणसे, अनय एकबोटे, तनिष्क आडे, सान्वी घाटेने मानांकित खेळाडूंवर विजय प्राप्त करीत आपली आगेकूच कायम राखली आहे.
शिवाजीनगर येथील मॉडर्न बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत पंधरा वर्षांखालील मुलांच्या गटात दहाव्या मानांकित नागपूरच्या आदित्य यउलने अव्वल मानांकित पुण्याच्या अर्जुन श्रीगडीवारचा १५-७, १५-६ असा , बाराव्या मानांकित मुंबई शहरच्या रुहान भाटियाने पाचव्या मानांकित ठाण्याच्या मयंक राजपूतचा १५-११, १२-१५, १५-६ असा पराभव केला. मुलींच्या गटात अठराव्या मानांकित पुण्याच्या कायरा रैनाने अहिल्यानगरच्या तिसऱ्या मानांकित विधी सैनीचे आव्हान १५-१३, १५-९ असे संपुष्टात आणले.
सतरा वर्षांखालील मुलांच्या गटात पुण्याच्या अनय एकबोटेने दुसऱ्या मानांकित अर्जुन श्रीगडीवारचा ७-१५, १५-११, १५-१३ असा, सोळाव्या मानांकित पुण्याच्या तनिष्क आडेने सातव्या मानांकित रायगडच्या प्रग्नय शिंदेचा १५-१२, ९-१५, १५-११ असा पराभव केला. मुलींच्या गटात नागपूरच्या बिगर मानांकित सान्वी घाटेने पाचव्या मानांकित रायगडच्या आयुषी निर्वाणवर ९-१५, १५-११, १५-११ असा, पुण्याच्या कायरा रैनाने तिसऱ्या मानांकित मनीषा तिरुकोंडा विष्णू कुमारवर १७-१५, १५-१३ असा विजय मिळविला.
निकाल :
पंधरा वर्षाखालील मुले : रुहान भाटिया ( मुंबई शहर) वि.वि. मयंक राजपूत (ठाणे) १५-११, १२-१५, १५-६; विहान कोल्हाडे (पुणे) वि.वि. हिमांशू चौधरी (धुळे) १५-९, १५-८; शारव जाधव (पुणे) वि.वि. आर्यन भोसले (पुणे) १५-११, १५-९; हृदान पाडवे (पुणे) वि.वि. देवांश ठकोर (नागपूर) १५-३, १५-७; प्रग्नय शिंदे (रायगड) वि.वि. यश हांडे (पुणे) १५-६, १५-४; आदित्य यउल (नागपूर) वि.वि. अर्जुन श्रीगडीवार (पुणे) १५-७, १५-६; हिमांशू भाटकर (रायगड) वि.वि. अक्षत नायक (पुणे) १५-१०, १५-५; सिब्तैनराझा सोमजी (पुणे) वि.वि. खुश दीक्षित (पुणे) १५-७, १५-११.
मुली : सान्वी घाटे (नागपूर) वि.वि. इशानवी काळे (पुणे) १५-९, १५-९; रुद्रनिराजे निंबाळकर (पुणे) वि.वि. स्वराली थोरवे (पुणे) १५-१३, ९-१५, १५-५; अन्विषा घोरपडे (मुंबई शहर) वि.वि. हर्षिका शर्मा (नागपूर) १५-१३, १३-१५, १५-४; ख्याती कत्रे (पुणे) वि.वि. टियान कॅस्टेलिनो (मुंबई उपनगर) १५-६, १७-१९, १५-११; स्वरा मोरे (पुणे) वि.वि. अनुध्या सातपुते (नागपूर) ९-१५, १५-४, १५-७; कायरा रैना (पुणे) वि.वि. विधी सैनी (अहिल्यानगर) १५-१३, १५-९;
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.