
पुणे - राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राज्य बँकेच्यावतीने प्रशासक विद्याधर अनास्कर आणि व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी शहा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह स्वीकारले.