पुणे - राज्य सरकारने सहकार क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी (संस्थात्मक प्रशासक) म्हणून नेमणूक केली आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकार क्षेत्रातील त्रिस्तरीय पतरचनेत जिल्हा सहकारी बँका महत्वाचा दुवा आहेत. जिल्हा सहकारी बँकांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडून सध्या विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून सरकारने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेची संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे, अशी माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.
राज्य सहकारी बँकेस प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमल्याने नागपूर जिल्हा बँकेच्या सक्षमीकरणासाठी राज्य सहकारी बँकेची सर्व साधने, संसाधने, तज्ञ कर्मचारी, निधी व मालमत्ता यांचा वापर करणे शक्य होणार आहे. तसेच, नागपूर जिल्हा बँकेसमवेत एकत्रितपणे कर्जवितरणासह इतर अनेक बँकिंग उपक्रम राबविणे राज्य बँकेस शक्य होणार आहे.
राज्य सहकारी बँकेचे 'नेटवर्थ' भारतातील सहकारी बँकिंग क्षेत्रात सर्वात जास्त म्हणजे पाच हजार 44 कोटी रुपये झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा बँकेतील कर्मचारी, थकीत कर्जदार यांनी सहकार्य केल्यास व ठेवीदारांनी संयम ठेवल्यास नागपूर जिल्हा बँक लवकरच पूर्वपदावर येईल.
तसेच, 'सहकारांतर्गत सहकार' हे मॉडेल यशस्वी होईल, असा विश्वास आहे. येत्या 30 मार्च रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सहकारी बँकेच्यावतीने प्रशासकाचा कार्यभार स्वीकारण्यात येईल, असे अनास्कर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.