
पुणे : ‘‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात जाणार नाहीत, याची काळजी घ्या. एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त ८०० ते ९०० मतदार असतील, अशा पद्धतीने केंद्रांची रचना करा. मतदान केंद्रांवर सोयीसुविधा, आवश्यक मनुष्यबळ, उपलब्ध मतदान यंत्र आदींबाबत सूक्ष्म रितीने नियोजन करा,’’ असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरुवारी दिले. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील ‘व्हीव्हीपॅट’ नसल्याचे या बैठकीवरून स्पष्ट झाले.